‘व्यासपीठ मराठी’त newsintercontinentalmu.in मधे पुर्वी प्रकाशित झालेले लेखांचे हे संकलन रसिकांना निश्चित आवडेल. व्यासपीठ मराठी हे वेबसाईट मधील एक निर्जीव ‘पेज’ करण्यापेक्षा सातत्याने नवीन पोस्ट्स चे संकलन जास्त ‘जिवंत ‘ असेल असा विश्वास वाटतो. यात विषयांचे बंधन नाही. परंतू सध्या वाचकांना थोडक्यात सर्व काही ताकदीने व्यक्त होणारे लिखाण आवडते त्यामुळे लेखकांना हे आव्हान आहे. त्यामुळेच  शब्दमर्यादा 750 ते 1000 राहिल याची कृपया नोंद घ्यावी. लेखकांनी तसेच कलाकारांनी त्यांच्या  निर्मितीचे फोटो  व लिखाण व्हाॅटसअप क्रमांक 8805007076 वर पाठवावे. ईमेजेस- फोटो-प्रतिमा स्वतंत्र पाठवाव्यात. 🙏 –                           मिलिंद उटगीकर

Please note that a separate stage is made available for English writers. The writeups about  international relations, foreign affairs, and international news with new inventions, science, technology, and environment will continue as it is.

व्यासपीठ मराठीत पोस्टस् ‘ताजी पोस्ट सर्वात वर’ अशी देवू यात म्हणजे सर्व एकत्र मिळत राहील.

newsintercontinentalmu.in वेबसाईट अंतर्गत ‘व्यासपीठ-मराठी’त आज रसास्वाद, परिक्षण व समीक्षा केली आहे कोल्हापूरचे प्रख्यात आर्किटेक्ट श्री मोहन शंकर वायचळ यांनी.

प्रस्तावना

हे दोन लेख छोटेखानी असले तरी त्यांचे विषय ‘हटके’ आहेत. प्रथम मर्मज्ञ परिक्षण आहे ते अंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या, स्वातंत्र्यापुर्वीच्या ब्रिटीश राज मधील प्रख्यात चित्रकारा अमृता शेरगील व तिची बहीण इंदीरा शेरगील यांच्यातील भावपूर्ण संबंधांचे -‘आपकी अमरी’ याअसामान्य नाट्यरूपांतराचे! हा नाट्याविष्कार आर्किटेक्ट साहेबांच्याच शब्दात “त्यांच्यातील मानसिक संतुलन, जगण्यातील अवघडलेपण अलगद पेश करताना, दोन बहिणीचा संवाद पराकोटीचा घनिष्ठबंध उलगडून दाखवितो”. उणेपुरे अवघे 28 वर्षांचे, (जानेवारी 30, 1913 ते डिसेंबर 5, 1941) पण ‘मुक्त’आयुष्य जगलेल्या अमृता शेरगील यांचे सारे आयुष्यच चाकोरीबाहेरचे आहे. वडील शीख तर आई हंगेरीयन. उमरावसिंग शेर-गील मजिठीया संस्कृत, पर्शियन चे स्कॉलर, उत्तम फोटोग्राफर व मेरी ॲन्टोनेट गोटस्मन हंगेरीयन गायिका व बॅले डान्सर. कला रक्तातच जणू. ती जन्मली बूडापेस्ट, हंगेरी येथे. हुषार, स्वतःच्याच जगात गुरफटलेली, बरीचशी आत्मकेंद्रित,हट्टी व आपल्या मतावर ठाम!शिक्षण घेत असताना ‘न्यूड’ चित्रे काढली म्हणून कॅथलिक स्कूल ने काढून टाकले. प्राथमिक कलेचे शिक्षण ईटलीतील फ्लोरेन्सला तर नंतर पॅरिस मधे. पुरूष, स्त्रीयां दोघांत इंटरेस्ट त्यामुळे प्रकरणे भरपूर. स्त्री कलावंत ती ही पौर्वात्य त्यामुळे संघर्षही भरपूर. स्वतंत्र स्वभाव व शैलीमुळे त्याकाळातील केवळ ‘युरोपियन शैली’त अडकून न पडता तिचा चित्रकलेतला आत्मशोध सुरू होउन पुन्हा हिंदुस्तानातील अजंठ्याला व भारतीय जीवनाला येउन भिडला. भारतीय लोकजीवनातील विविध रंगाने सुशोभित व विशोभित झालेल्या गरीब स्त्रीयांचे मूक, काही वेळा काळात गोठलेले, काही वेळा जिवंत अपूर्व असे चित्रीकरण तिने केले. भारतीय चित्रकलेत ‘माॅडर्निजम’आणण्याचे श्रेय तिच्यासह रवींद्रनाथ टागोर, जेमिनी राॅय यांना दीले जाते व 2013 हे तिच्या जन्मशताब्दीचे वर्ष ‘युनेस्को’ ने ‘तिचे अंतराष्ट्रीय वर्ष’ म्हणून जाहीर केले हे तिचे महानपण सिद्ध करण्यास पुरेसे आहे.

“तिचं शहर होणं” ही रसिका आगाशे यांची निर्मिती. मध्यमवर्गीय पांढरपेश्या ,उच्च मध्यमवर्गीय समाजाच अगदी घरातल्या स्वच्छतेच्या कामापासून ते सगळ्या कनिष्ठसेवापर्यंत तळागाळातील गरीब झोपडपट्टीतील लोकांवर अवलंबून असण आणि ‘माझभागल पुरे झाल” व ‘मला काय त्याचे’ अस डोळ्यावर कातडं ओढून त्यांची जगण्याची धडपड,अडचणी त्यांची अवस्था याकड दुर्लक्ष करणं या विषयावरचा. या चित्रपटाचे अल्पसे परिक्षण.चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणारे. रसिका आगाशे या ‘बिईंग असोसिएशन’ Being Association या थिएटर ग्रूप च्या अभिनेती/लेखिका व दिग्दर्शक आहेत. मुळ पुण्याच्या मनस्वी व्यक्तिमत्वाच्या आगाशे स्वतंत्र ‘लिबरल’ विचारसरणीच्या.’नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा-नवी दिल्लीच्या विद्यार्थिनी. मराठी, हिंदी, इंग्लिश व संस्कृत मधील नाट्यानुभव असलेल्या रसिका नंतर मुंबईत आल्या. मोहम्मद झिशान अयुब यांच्याशी त्यांनी विवाह केला असुन या दांपत्यास राही हे कन्यारत्न ही आहे. कोल्हापूर मधे ‘तिचं शहर होणं’चे नुकतेच स्क्रीनिंग झाले. 〰️ 🏵 मिलिंद उटगीकर

या सर्व लेखांचे लेखक आर्किटेक्ट श्री. मोहन शंकर वायचळ यांचा वेबसाइटच्या नियमित वाचकांस परिचय आहेच. नवीन वाचकांसाठी तो पुन्हा देत आहोत. ~ ~मिलिंद उटगीकर

आर्किटेक्ट श्री मोहन शंकर वायचळ

  माझे मूळ कुटूंब कृषिप्रधान. १९१२- च्या प्लेगमधे सांगलवाडीतील आजोळी  विस्थापित होऊन मौ. आंबेवाडी (जि. कोल्हापूर) येथील शेतावर स्थलांतरित झाले. तेथेच वडील एक वर्षाचे असताना आजोबा वारले. अशा पिचलेल्या परिस्थितीत वडिलांनी बालवयात टाकमोड्याचे (शिंपी)  व्यवसाय काम सुरू केले.त्यामुळे ते शालेय शिक्षण घेऊ शकले नाही.पण कौशल्याच्या आधारावर त्यांनी  शिंपी व्यवसायात नाव कमावले. माझा जन्म १९४५ चा, वय ७९ आहे. एकूण आम्ही अकरा भावंडे. पण वडिल अशिक्षित राहिल्याने त्यांच्या  इच्छेखातर आम्ही सर्वजण पदवीधर झालो. सर्व शहरी मान्यवर कुटूंबाशी सोयीरिकी जमून आल्या. मला चित्रकलेची आवड बालपणापासून होती. मॅट्रिकला चित्रकला हा विषय होता. साहजिकच वास्तुकलेचा माझा प्रवेश मुक्रर झाला. पुणे येथे वास्तुकलेचे शिक्षण झाले पण त्यातील उच्चशिक्षण मुंबईतील केंद्राअभावि अपूर्ण राहिले. पदवी मिळताच १९६७ साली व्यवसायाचा श्रीगणेशा. जेष्ठ व कनिष्ठ भावाच्या सहयोगाने सुरु केला.कष्ट, कला व घरच्या पुण्याईने लवकरच नावलौकिक मिळाला व व्यवसायाला स्थिरता आली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत गेल्या ५७ वर्षात ५०० च्या वर सर्व प्रकारच्या वास्तूरचना व अंतर्गत सजावटी केल्या आहेत.वडील अशिक्षित असल्याने त्यांनी स्थिरतेसाठी सामाजिक कार्यात प्रवेश झाला. प्रवास व सार्वजनिक सेवेसाठी त्यांनी ज्ञाती बांधव, नगरपालिका ,लायन्स क्लब,अर्बन बँका येथे आपल्या गुणवैशिष्ट्या मुळे सर्व क्षेत्रात अच्युत स्थान मिळवले. त्यांनी ११०० पानाचा धार्मिक ग्रंथ प्रकाशित केला.…..ग्रंथ प्रकाशित केला. आईनेही त्याना आयुष्यभर साथ देत आजूबाजूच्या पंचक्रोशीतील आयाबहिणीसाठी गरजू कपडेलत्तेचे शिवणकाम केले. हेच बाळकडू आम्हास मिळाले. त्यामुळे मला गार्डन्स क्लब, रोटरी क्लब, आर्किटेक्ट व इंजिनियर असोसिएशन, राष्ट्रीय संघ अंधकल्याण समिती,इंटेरियर डिझाईनर, मा.राज्यपाल नियुक्त शिवाजी विद्यापीठावर समिती सदस्य अशा अनेक  स्थानावर सल्लागार म्हणून धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. वास्तुकलेत रचना व सल्लागार भूमिका  सांभाळताना 29 वर्ष आर्किटेक्चर व इंटेरियर डिझाईनर अशा जवळपास सर्व कॉलेजमध्ये अतिथी शिक्षक म्हणून काम केले .तसेच वास्तुकलेवर अनेक स्लाईड शो केले .या कामगिरीमुळे जिल्हा प्रथम वास्तुशिल्प पुरस्कार, दुर्गा पुरस्कार ,शिल्प पुरस्कार असे पुरस्कार लाभले. वर्तमानपत्रे, नियतकालिका, स्मरणीका यामध्ये अनेक लेख छापून आले. माझे वास्तूपर्व हे वास्तुकलेवरील सामाजिक आशय असलेले प्रथम पुस्तक प्रकाशित झाले. स्मरणभूमी या दुसऱ्या पुस्तकाची तयारी चालू आहे.कुटुंब व्यवस्थेत सौ.रंजना या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून कन्या,जावई व नातू आर्किटेक्ट आहेत. चिरंजीव व सून इंटरियर डिझाईनर असून बगीचा तज्ञ आहे. नातू कला क्षेत्रात शिक्षण घेत आहे.                           – मोहन शंकर वायचळ,    आर्किटेक्ट / इंटेरिअर डिझाईन कोल्हापूर चाप्टर.

1. ‘आपकी अमरी’

एकीकडे पाश्चात्य कलासंस्कार व
दुसरीकडे भारतीय कलासंस्कृतीची व्यामिश्रता.
‘समजून घेण्याची आस असणाऱ्या, अमृताने’,
जेव्हा पाश्यात्य सृजनात्मक प्रभावात
भारतीय विषयवस्तू एकत्र आणले-
तिथे मात्र रोमहर्षक परिणाम साधला!
तिची प्रतिभा आणि बहुआयामी चित्रकलेतून
अलौकिक कलाकाराचं दर्शन घडवणारं ,

“आपकी अमरी”
मुसव्विर अमृता शेर-गील

संकल्पना, संकलन आणि दिग्दर्शन : शेखर नाईक

हिंदी नाटक ( १६+)
आयोजक आर्ट कनेक्ट , कोल्हापूर

कोल्हापुरातील कार्यक्रम.

आपकी आमरी………एक विलक्षण नाट्यानुभव एका गुढ पण विस्मयकारक चित्रकर्तीचा पट मांडताना नाट्य आविष्कारचे अनोखे दर्शन दर्शकांना अनुभावयास मिळाले.

जवळपास शतकापूर्वीची चित्रकारिता,उच्चलब्ध कुटुंबातील कलेबद्दलची आसक्ती, प्रेम आणि वास्तव याची बौद्धिक आगळीक, अवहेलना व पलायनवादी भूमिका या सर्वांचे मुक्त विचार मंथन व सर्व ताण वाढवणारे प्रसंग व ते पेलण्यासाठी आसुसलेले प्रेक्षागृह हा विलक्षण नाट्यानुभव अनुभवला गेला. युरोपातील बूडापेस्ट [हंगेरी] वातावरणात वाढलेल्या पंजाबीकन्या, अवकाळी गहिवर भोवताल, पौरुषाबद्दल असलेला अहंभाव अशा या नाट्यातल्या हसऱ्या, खोडकर नायिका, विलक्षणरीत्या जगण्याला आव्हान देतात. त्यांच्यातील मानसिक संतुलन, जगण्यातील अवघडलेपण अलगद पेश करताना, दोन बहिणीचा संवाद पराकोटीचा घनिष्ठबंध उलगडून दाखवितो.

या परिस्थितीवर मात करताना शाब्दिक करामती करीत शरसंधान करणे हा त्याचा फोबिया, पण उच्चकोटी कुटुंब व्यवस्थेतील त्यांचे दुखणे नजारे हेलावून टाकतात. जवाहारलाल बद्दल तिचे स्वगत आहे. स्त्री धर्माची खोचक वृत्ती हा नैसर्गिक अहंभाव नेहरुच्या आत्मचरित्रावर टोकणे हे लक्षणीय प्रकरण आहे. नेहरुबद्दल येथे आदर बळावतो. कोमल व राकट अश्या या दोन बहिणींचा अनुलोम संबंध, त्यांचा पुसटसा स्पर्श, जो आज जागतिक रोगट परिस्थितीचा निर्देश करतो, तो हाताळताना दिग्दर्शक कमालीची सोशिकता दाखवितो,मराठी भाषिकांना हे सर्व अनुभवण्यासारखे आहे. अमृताचा संसारी काळ दिल्ली व सिमला येथे जातो. भारतीय भूमीतील उत्सवी परिसर,एत्तदेशियांचे विपन्न अवस्थेतील कलासक्त मन, जगण्यामागील कुतूहूल, नर-नारींचे चित्रे रेखाटताना इथल्या मातीतले रंगालेपण, त्यांचा उजाळा पाहून स्तंभित होतो. पण याचवेळी हीच चित्रकर्ती युरोपातील निरोगी नग्न शरीराचे मापदंड तोलताना त्यातला अवकाळलेला देह तितक्याच ताकतीने ती रेखाटते.

अमृता शेरगील (जन्म 10 जानेवारी 1913 निधन 5 डिसेंबर 1941) यांची काही चित्रे

जगाच्या रंगमंचावर आपण फक्त प्यादे आहेत हा क्लायमॅक्स नाट्याचा अंतिम अध्याय कमालीचा प्रदर्शनीय आहे. मग तो अ‍ॅडॉल्फ असो वा अमृता असो, हिटलरचा सहानुभूतीबद्दलचा आक्षेप आणि शेरगीलची संवेदनशीलतेची तडफड हे फारच परिणामकारक आहे. छळछावणीत व्हिक्टरचा मृत्यु हा वेदनादायी आहे. थोडक्यात अशा व्यक्तिमत्त्वाचा आत्मघात हा त्याचा DNA असतो. चित्रातील तरलता,जगण्यातील वास्तव याच्या घालमेलीत अशा पिढीचे बिकट व्यवस्थेचे दर्शन, येथे दिग्दर्शक शेखर नाईक हुशारीने करतो.उर्दुमिश्रीत अवीट गोडीची हिंदी भाषा, नाट्याचा ठाव घेते.दोन्ही नायिका (आपटे व लहाडे) हे आकाश पेलताना त्यांच्या पराकाष्ठेचे कौतुक करावे वाटते. अखेरीस ऐन तारुण्यातील भावविश्व कोलमडताना सहकालीन तरुणाईने हा नाट्याविष्कार पाहण्यासारखा आहे कलेच्या अनुबंधाचे पाश परिस्थितीशी जुळवताना, कलहाच्या टोकाशी पदरमोड कशी करता येईल हे मोठे आव्हान यापुढे असणार आहे. हे तो दर्शवितो. ही दोन अंकी प्रहसिका तुम्हाला कमालीची खेळवत राहते. आपल्या विविधतेच्या देशात याचे प्रतिबिंब क्षणोक्षणी जाणवते. कलेचा वारसा, त्याचे संस्कृतीकरण हे अबाधित ठेवणे हे मात्र खरे! सिनेमाग्राफी आणि नाट्याविष्कार हे माध्यम, मोठ्या आर्थिक बाबींचा विषय आहे. ते यापेक्षा जास्त पुढारलेले वायरलेस जागतिक नाट्यमंचावर याचे जोरकस स्वागत होईल. चित्रकर्मी संजय गायकवाड, पुण्याचा नयन पडवळ त्यांनी ही दोन अंकी प्रहसिका करवीर करांना सादर केली याबद्दल त्यांचे खास अभिनंदन . अनंत शुभेच्छा *मोहन शंकर वायचळ* (आर्किटेक्ट)

अमृता शेरगील

Recently, a rare painting of the artist, Late Amrita Sher-Gil, is found. A link to a CNN coverage is given below .. Milind Utgikar.

https://amp.cnn.com/cnn/style/article/amrita-sher-gil-auction/index.html

सदर कार्यक्रमाचे कोल्हापुरातील आयोजक आर्ट कनेक्ट हे होते. कलाविष्कार समाजाला आनंद देणारा, सृजनशील बनवणारा, परस्परांच्या विचारांविषयी व कल्पकते विषयी आदर वाढवणारा थोडक्यात निकोप लोकशाही वाढीस चालना देणारा आहे त्यामुळे कलेस प्रोत्साहन देणार्या संस्था वाढल्या पाहिजेत. आर्ट कनेक्ट चा परिचय खाली देत आहोत.

आर्ट कनेक्ट

आर्ट कनेक्ट ची स्थापना २०१२ सालची
कलेचा मोठा वारसा लाभलेल्या कोल्हापूरात
कलेचे महत्त्व आणि सामर्थ्य समाजापर्यत पोहचवणे,
समाज आणि कलात्मक अभिव्यक्ती यांत एकात्मता वाढवणे, कलाविषयक ज्ञानाच्या देवाण घेवाणी बरोबर सर्जनशीलता व नवकल्पना समृध्द करण्याच्या दृष्टीकोनातून आर्ट कनेक्ट ची स्थापना झाली .
आर्ट कनेक्टने आज पर्यंत
पाच आर्ट फेस्टीव्हलस् ( २०१२ ते २०१६ )
तीन ग्राफिक वर्कशॅापस्
दोन आर्ट कॅापिटीशनस्
यांचे आयोजन केले.
२०२२ मध्ये दृककला विचारांची क्षितिजं विस्तारणारं ,दृश्य कलेतील सौंदर्याचं साक्षात आकलन व दर्शन घडवणारं,निर्मितीक्षम कलावंत आणि संवेदनशील शिक्षक,लेखक प्रभाकर कोलते यांचं
‘ मुक्तचिंतन आणि दृकचिंतन ’
विषयावर दिनांक १५ एप्रिल रोजी जागतिक कलादिनाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यान
रविवार दि. १३ नोव्हेंबर २२
अभिवाचन
‘व्हान गॉगच्या चित्रांसह एक नाट्यानुभव’
आणि ‘टुगेदर’ या समुह चित्रप्रदर्शनास मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादा नंतर
२५ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय कलाकार दिनाचे औचित्य साधून
रविवार दि २९ ऑक्टोबर २३
अमृता शेरगिल ह्यांचा जीवनपट उलगडणारं
आणि
त्यांच्या चित्रकारितेचं,त्यांच्यातल्या अलौकिक कलाकाराचं दर्शन घडवणारं ,
२२ व्या भारत रंग महोत्सव दिल्ली येथे निवड झालेलं,
“आपकी अमरी”
मुसव्विर अमृता शेरगिल
हिंदी नाटक,संकल्पना, संकलन आणि दिग्दर्शन : शेखर नाईक आणि ‘ वुमनस् ईरा ‘ हे कोल्हापुरातील ३१ स्त्री चित्रकर्ती चे चित्र प्रर्दशन. – ‘आर्ट कनेक्ट’, संजय गायकवाड, कोल्हापूर. 9423923623

🎨🎭🎨🎭🎨🎭🎨🎭

2.’तिचं शहर होणं’

लेखक श्री.वायचळ दिग्दर्शक रसिकाताई आगाशे यांच्याशी संवाद साधताना.

तिचं शहर होणं……
एका ज्वलंत विषयावरील अत्यंत स्फोटक पण सत्य दाखवणारा हा विलक्षण चित्रपट त्याच्या संहितेमुळे लक्षवेधी झाला आहे. वस्ती ,वसाहत आणि वास्तव या आपल्याच पण त्यापासून दूर असलेल्या मध्यमवर्गीय समाजाचे, चौकटीच्या आतील बंदिस्त जग व घुसमटलेल्या बकाल वस्तीतील आहेरे जग यांच द्वंद ,दिग्दर्शक रसिकाताई पडद्यावर थक्क करायला लावतात.संविधान आज परवलीचा शब्द झाला आहे. धर्मापासून अलिप्त असणारी धम्म संस्कृती, त्यांच्या मानवीकरणाच्या जाणिवा , नाहिरे वर्गातील संकुचित वर्तन व अलिप्तपणा, हे फार मोठे मर्म त्या चित्रीत करताना सत्यजित राय यांच्या पथेर पांचलीमहानगर या चित्रपटातील भारतभूमीतील वास्तवदर्शन येथे त्यानी अधोरेखित केले आहे. पण ढांचा मात्र ऑस्कर शर्यतीतील कोर्ट या सिनेमाशी जोरदार टक्कर देणारा आहे. आठरापगड जाती-जमातील या देशात व्यवस्थेतील टोकदार प्रसंग डोळ्यात अंजन घालणारे आहेत. सोनाली कुलकर्णी या गुणी अभिनेत्रीने येथे दमदार भूमिकेत वैचारिक पट मांडला आहे. कथीत अश्या अस्थिर आणी कर्तव्यशून्य जगाला, तळागाळातील वस्तीतून त्वेषाने जगण्यामागचे तत्वज्ञान पोहोचण्यास दिग्दर्शिका कमालीच्पा यशस्वी झाल्या आहेत. यातील निखळ अश्या अविस्मरणीय घटना, संकलन,चित्रण आणी निर्मिती उच्च दर्जाची असून कोणत्याही समीक्षेत अव्वलस्थान प्राप्त करण्याची क्षमता या चित्रपटाची आहे.एकूणच काॅ.संतराम पाटील ट्रस्ट व डाॅ.अनमोल कोठडीया, समाजसेवक अतुल दीघे यांचेद्वारे करवीरकराना सादरीकरण ही अत्यंत सर्जनशील व कलात्मक अशी २ तासांची चित्रफीत सद्यकालीन व्यवस्थेत विचार करायला लावणारी आहे…
•• मोहन शंकर वायचळ [आर्किटेक्ट]

ट्रेलर-तिचं शहर होणं

🎦📽🎬🎞🎥🎦

http://newsintercontinentalmu.in/artgallery/


🖋🎨🖋🎨🖋🎨